---Advertisement---

नफ्याचे आमिष दाखवत वकिलाची 95 लाखांत फसवणूक; जळगावातील तीन व्यावसायिक अटकेत

---Advertisement---

जळगाव : कंपनीत आर्थिक गुंतवणूक करून नफ्याचे आमिष दाखवून एका वकिलास ९४ लाखांचा गंडा घातला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यांत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनीष सतीश जैन (वय ४०), अतुल सतीश जैन (वय ५०, दोन्ही रा. यश प्लाझा) तसेच विजय इंद्रचंद ललवाणी (रा.सिंधी कॉलनी) या तिघांना गुरुवारी (१ मे) संध्याकाळी अटक केली. शुक्रवारी (२ मे) तिघांना न्यायालयात हजर केले असता ७मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शिरीन गुलाम अमरेलीवाला (वय ६५, रा. शांतीबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी जळगाव) हे वकील आहेत. संशयितांनी संगनमताने भूमिरत्न रिअल इस्टेट प्रा. लि. नावाची बनावट कंपनी तयार केली डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान संशयितांनी अॅड. शिरीन अमरेलीवाला यांना प्रती माह १.५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून रक्कम कंपनीत गुंतवणूक करण्याचा बहाणा केला. अॅड. शिरीन यांनी ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

ही रक्कम कंपनीत गुंतवणूक न करता संशयितांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. ठरल्यानुसार परताव्याची रक्कम घेण्यासाठी अॅड. शिरीन हे कंपनीच्या यश प्लाझा येथे कार्यालयात गेले असता संशयितांनी त्यांना परतावा न देता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी अॅड शिरीन अमरेलीवाला यांच्या तक्रारीनुसार ७ जानेवारी २०२५ रोजी शहर पोलीस ठाण्यात मनीष जैन, अतुल जैन, यशोमती जैन, जाफरखान मजीदखान, विजय ललवाणी, अक्षय अग्रवाल, केतन काबरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यांत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सतीश जैन, अतुल जैन आणि विजय ललवाणी यांना अटक केली. तपासाधिकारी व पोलीस निरीक्षक सुदाम काकडे यांनी आज या तिघांना न्या. बढे यांच्या न्यायालयात हजर केले होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment