जात-पात बाजूला ठेवून हिंदू म्हणून मतदान करा : नीलेश भिसे यांचे आवाहन

धरणगाव : स्त्रियांवरील अत्याचार ‘लवजिहाद’ यासारखे प्रश्न सोडवायचे असतील, या देशात हा बदल करावयाचा असेल तर अभ्यासू व्यक्तिमत्त्व नरेंद्र मोदी यांची माणसं. उमेदवार आपल्याला निवडून द्यावी लागतील. यासाठी विधानसभेच्या या निवडणुकीत जात-पात, प्रांतभेद बाजूला ठेवून हिंदू म्हणून मतदान करा, असे कळकळीचे आवाहन शिवशंभो चरित्र अभ्यासक नीलेश भिसे यांनी केले आहे.

धरणगाव येथे तरुण भारत- सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा. लि. तर्फे शनिवारी सायंकाळी शिव प्रेरणा जागर अभियानांतर्गत शिवशंभो चरित्र अभ्यासक नीलेश भिसे यांचे व्याख्यान जैन गल्लीतील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व. मुकुंदराव पणशीकर हॉलमध्ये झाले. नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना काबरा अध्यक्षस्थानी होत्या, प्रमुख अतिथी सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.चे कार्यकारी संचालक रवींद्र लढ्ढा होते.

प्रारंभी मातृशक्तीला प्रेरणादायी गीत सादर करण्यात आले. सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.चे कार्यकारी संचालक रवींद्र लढ्ढा यांनी प्रास्ताविक केले. सामाजिक चळवळ वाढीसाठी ‘तरुण भारत’ दिवाळी अंकासह विविध उपक्रम राबवित असतो. ‘सजग रहो’ अभियानांतर्गत सामाजिक चळवळीचा एक भाग म्हणून आजचे व्याख्यान आयोजित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भरकटलेल्यांकडून आंदोलन
वक्ते नीलेश भिसे पुढे म्हणाले, फॅमिनिझमचे आंदोलन युरोपमध्ये सुरू झाले. तेव्हा त्यांची पहिली मागणी होती की, आम्हाला समानता हवी. दुसरी मागणी होती स्त्रियांना मतदानाची. पण आपल्या हिंदू धर्मात न्यायदानाचे काम एक स्त्री बजावत होती. न्यायाधीश म्हणून मंडल मिश्रांची पत्नी काम बघत होती. तेव्हा आपल्याकडे या समस्या नव्हत्या. पुढे भरकटलेल्या डाव्यांनी आंदोलन केले. कुटुंब संस्था उद्ध्वस्त केल्या. आपण पुरुषांची गुलामगिरी झुगारून दिली पाहिजे, असे हे आंदोलन भरकटत गेले. या चष्म्यातून हिंदूंकडे पाहिले गेले. येथे या समस्या नव्हत्या, पण या समस्या आहेत, अशी मांडणी मुद्दामहून केली होती. मग स्त्रीवादाचं वारं भरकटू लागतं. आपल्या सर्व देवता या स्त्रीशक्ती रूपात आहेत. आपल्या संस्कृतीने स्त्री-पुरुषण असा भेदभाव कधीच केला नाही. प्रार्थनास्थळात जाण्याची स्त्रीला परवानगी नाही. पण आपल्याकडे तसे नाही. जोपर्यंत आपली धर्मचारिणी आपल्या बाजूला बसत नाही तोपर्यंत पूजा होत नाही. मग आपल्याकडे स्त्री-पुरुष असमानता कुठे आहे? पण तसा अपप्रचार केला गेला. जे स्त्री-पुरुष असमानतेच्या गप्पा मारतात त्यांनी अर्धांगिनी शब्दाचा अभ्यास करावा. आईच्या नावाने मुलाची ओळख होते. पतीच्या नावाने पत्नीची ओळख होते. मांडणी मात्र चुकीची केली गेली. चूल-मूल यावर स्त्री अडकून पडली, अशी मांडणी केली गेली. अशी जे मांडणी करतातत्यांच्यासाठी राजमाता जिजाऊ हे उत्तम उदाहरण आहे. चुकीची मांडणी करणाऱ्यांविरुद्ध काही गोष्टी रोखायच्या असतील, तर येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला नरेंद्र मोदींची माणसं पाठवायची आहेत. असे आवाहनही मिसे यांनी शेवटी केले.

डॉ. अर्चना काचरा यांचा सत्कार ‘तरुण भारत’च्या विणपन सहायक गायत्री कुलकर्णी यांनी केला. नीलेश भिसे पांचा सत्कार रवींद्र लड्डा यांनी केला. रवींद्र लढ्ढा यांचा सत्कार शोभा चौधरी यांनी केला.

सूत्रसंचालन वर्षा देवेंद्र अत्तरदे यांनी केले. मंजुषा राजपूत यांनी आभार मानले. सप्तमी चौधरी यांनी गीतगायन केले. व्याख्यानासाठी शुभांगी रायपूरकर, नीलिमा चौधरी, दीपाली महाजन, वैशाली महाजन, मेघना चौधरी, योगिता वाणी, नंद महाजन, देवेंद्र अत्तरदे, रवींद्र चौधरी यांनी सहकार्य लाभले.

नरेंद्र मोदींच्या सरकारपासून शिक्षण पद्धतीत बदल
व्याख्याते नीतेश भिसे यांनी पुढे सांगितले की, हिंदू धर्म कसा दलित विरोधी आहे, हे शिक्षण पद्धतीतून शिकविले गेले. देशातील पत्रकार, लेखक यांनी ही शिक्षण पद्धती कशी आहे यावर आपापल्या पद्धतीने भाष्य केले. पण २०१४ मध्ये राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. तेव्हापासून या शिक्षण पद्धतीत बदल झाला आहे. हे बदल पुढेही घडावे असे आपल्याला वाटत असेल तर त्या नरेंद्र मोदीचे जे उमेदवार आहेत, माणसं आहेत, त्यांना निवडून दिले पाहिजे, त्यांना सत्तेवर बसविले पाहिजे. मग विधानसभा निवडणुका असो की, यापुढे येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत नरेंद्र मोदींची माणसं, नरेंद्र मोदीचे उमेद‌वार यांना आपण निवडून दिले पाहिजे. तर देशात बदल होईल. देशात राजसत्ता हातात असेल तर आपण योग्य तो बदल करू शकतो. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदीसारखा माणूस आपल्या देशाचं नेतृत्व करतोय. त्यांना फक्त देशाची निःस्वार्थपणे सेवा करायची आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेशात भेटीला जातात, तेव्हा तेथील राष्ट्रप्रमुखाला भगवद्गीता भेट देतात, असा तपस्वी माणूस देशाच्या प्रमुखपदी बसला आहे. यापूर्वीची परिस्थिती वेगळी होती.

जास्तीत जास्त मतदानासाठी विविध उपक्रम
वक्ते नीलेश भिसे म्हणाले, आजच्या स्थितीत विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत हे व्याख्यान घेत आहोत. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी अनेक वक्त्यांची अनेक व्याख्याने आयोजित केलेली आहेत. त्यातीतच आजचे हे एक व्याख्यान आहे. अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, यासाठी ‘तरुण भारत’ का पुढाकार घेत आहे, तर राजकीय सत्ता चांगल्या लोकांच्या हाती असावी, असं आपलं स्वच्छ आणि स्पष्ट म्हणणं आहे. राजकीय सत्ता जर दुर्जनांच्या हाती गेली तर काय होऊ शकतं आणि कश्शा रीतीने हिंदूविरोधी शक्ती राजकीय सता आपल्या हातात घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, हे आपण पाहिले.