---Advertisement---

Leopard Attack: पाडळसे  परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; भोरटेक येथे गुरांच्या गोठ्यावर हल्ला करत म्हशीचा पाडला फडशा

---Advertisement---

Leopard Attack: यावल तालुक्यातील पाडळसे  परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा धुमाकूळ वाढला आहे. आज पहाटे भोरटेक गावाजवळ  अरुण  रमेश  कोळी यांच्या  गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून बिबट्याने  एका 4 वर्षच्या म्हशीचा फडशा पाडला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून पाडळसे  आणि आसपासच्या शिवारात  बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होती. काही ग्रामस्थांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले असल्याचा दावाही केला होता. मात्र, आज पहाटे घडलेल्या या घटनेमुळे बिबट्याच वावर निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

भोरटेक येथील शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून बिबट्याने म्हशीचा फडशी पाडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी  म्हशीचे पोस्टमार्टम डॉक्टर भगुरे यांनी केले व पंचनामा करण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आपल्या पशुधनाच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत. शेतात एकटे जाण्यासही नागरिक धजावत नाहीत, कारण बिबट्या मानवी वस्तीजवळ येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेची माहिती पाडळसे येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी वन विभागाला कळविल्याने वनविभागाचे अधिकारी  घटनास्थळी दाखल झाले असून वनक्षेत्रपाल यावल पूर्व एस. एम. पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डोंगरकठोरा आयएएस तडवी, वनपाल फैजपूर अतुल तायडे, वनपाल गस्तीपथक  आर. एम. जाधव, वनरक्षक गणेश चौधरी, वनरक्षक आय.बी. चव्हाण, वाहन चालक वाय.डी. तेली  घटनास्थळी दाखल झाले असून वनविभागाकडून बिबट्याच्या पावलांचे ठसे आणि इतर पुरावे गोळा करून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वनविभागाने तातडीने या बिबट्याला पकडून सुरक्षित स्थळी हलवावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. अन्यथा, भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत कासवा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य अरुण कोळी यांनी आमदार अमोल जावळे यांना माहिती दिली. आमदार हे मुंबई विधानसभेच्या अधिवेशनासाठी असताना त्यांनी मुंबईहून वन क्षेत्रपाल  स्वप्निल पटांगरे  यांना  बिबट्याला जेरबंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---