नवी दिल्ली : लातेहारच्या पलामू व्याघ्र प्रकल्पात बिबट्याने बालिकेवर हल्ला केला. यात बालिका गंभीर जखमी झाली. तीला तत्काळ मेदनिगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
चिपडोहर पश्चिम येथील उकमड गावातील ही बालिका आहे. ती जंगलात फिरायला गेली होती. दरम्यान बिबट्याने तीच्यावर हल्ला केला. यापूर्वीही येथे बिबट्याने दोन वन कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केले होते. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. जयप्रकाश साहू यांनी सांगितले की, बिबट्याच्या हल्ल्यामुळे वन कर्मचारी अखिलेश यादव यांच्या हाताला आणि मांडीला दुखापत झाली आहे.