तळोदा (मनोज माळी) : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महामार्गावरील अक्कलकुवा ते खापरदरम्यान वळण रस्त्यावर असलेल्या यामिनी हॉटेल जवळ ही घटना घडली.
रवापर कडे जाणाऱ्या वळणरस्त्यावरील यामिनी हॉटेल जवळ बिबट्या रस्ता ओलांडत होता. दरम्यान, भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहानाने बिबट्याला जबर ठोस दिल्याने बिबट्या जागीच ठार झाला. मौजे जामली कं.नं. 416 N.H. -753-B या रस्त्यावरून वनक्षेत्रपाल अक्कलकुवा व स्टाॅप यांच्यासह गस्त करीत असताना हा अपघात उघडकीस आला.
वन्यप्राणी बिबट (नर) अंदाजे वय 6 वर्ष मृत दिसून आला. पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करण्यात आले. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अक्कलकुवा ललित गवळी , वनपाल अंकुश विहीर, के.बी. धात्रक व इतर वन कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, सदर बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी माणद ,वन्यजीव रक्षक नंदुरबार, वनकर्मचारी, ग्रामस्थ यांच्या समक्ष बिबट्याचे शव दहन करण्यात आले. पुढील तपास संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे.