पंढरपूर : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रूक्मीणीचे दर्शन घेऊन कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी सुखी -समाधानी होऊ देत. सर्वांना सुख-समृध्दीत ठेवण्यासाठी व जिल्ह्यासह राज्याचा विकासाबाबत साकडे घातले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पंढरीच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. गेल्या सुमारे तीन दशकांपासून ते नित्यनेमाने वारीला जात असतात. अगदी कोरोनाच्या काळात देखील त्यांनी मंदिराच्या बाहेरून विठुरायाचे दर्शन घेतले होते. ना. गुलाबराव पाटील यांनी आज पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रूक्मीणीचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यासह राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत. विशेष करून चांगला पाऊस पडून बळीराजाला चांगला हंगाम मिळून आबादानी व्हावी. असे साकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत डॉ. कैलास पाटील, रवी पाटील, प्रवीण पाटील, खाजगी सचिव अशोक पाटील, ओ. एस. डी. गणेश बडे, माजी उपसरपंच चंदन कळमकर यांच्यासह आदी उपस्थित होते.