‘त्या लव्ह जिहाद’सारख्या प्रकरणावर पोलिसांची मेहरनजर

तरुण भारत  लाईव्ह न्यूज : दिल्लीतील श्रध्दा वालकरची ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून झालेल्या हत्येने देशात खळबळ उडाली. अफताबने केलेल्या कृत्याचा देशभर निषेध झाला. मात्र सोमवारी शहरातील शिवकॉलनी परिसरातही ‘लव्ह जिहाद’ची किनार असलेली घटना समोर आली. त्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी या घटनेतील दिल्लीच्या मुस्लीम तरुणावर मेहर नजर दाखवत त्यांचे जबाब लिहून घेत समज देऊन त्याची सुटका केली.

पोलिसांनी सोमवारी तरुण-तरुणीस शिवकॉलनीतून रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र दोघांचे जबाब लिहून तरुणास समज देऊन सोडून देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दिल्ली येथील मुस्लीम तरुणास पोलिसांकडून तक्रारीअभावी ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी अजूनही माध्यमांना घटनेचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

सध्याच्या ‘लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिप’मुळे ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना वाढत असल्याचे जाणकाराचे म्हणणे आहे. या घटनेसंदर्भात ‘तरुण भारत’ने वृत्त दिल्यानंतर दिवसभर यासंदर्भात शहरात चर्चा सुरू होती, तर काहींनी संबंधित युवकावर कडक कारवाईची अपेक्षा केली. मात्र पोलीस प्रशासनाच्या सावध पावित्र्यामुळे हे प्रकरण शांत
झाले.