---Advertisement---

Dhule News: फुगा फुगवतांना तोंडातच फुटला अन्…, चिमुकलीचा दुदैर्वी मृत्यू

by team
---Advertisement---

धुळे : शहरातील यशवंत नगर परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. फुगा फुगवताना 8 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फुगा फुगवताना तो तोंडातच फुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : ‘घरी ये, कोणी नाहीय…’, सख्ख्या बहिणींनी व्यापाऱ्याला बोलावलं अन्; वाचा नेमकं काय घडलं?

यशवंत नगर परिसरात आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना 8 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डिंपल मनोहर वानखेडे असं मृत मुलीचं नाव आहे. अंगणात फुगा फुगवताना तोंडातच तो फुटला आणि घशात त्या फुग्याचा तुकडा अडकल्याने तिचा श्वास कोंडला. श्वास घेण्यास त्रास होतोय हे लक्षात येताच घरच्यांनी तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं. परंतु डॉक्टरांनी मुलीस तपासून मृत घोषीत केले. या घटनेमुळे वानखेडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आठ वर्षीय डिंपलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment