तुम्ही अशा हजारो कंपन्या पाहिल्या असतील ज्या फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांना काम करून नफा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतात. पण, महारष्ट्रातील Lloyds Metals and Energy Limited या कंपनीने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी करोडपती बनले. हे कर्मचारी कोणी व्यवस्थापक, सीईओ किंवा टीम लीडर नाहीत . तर हे सर्वजण खाणीत काम करणारे मजूर आहेत.
महाराष्ट्रातील माओवादग्रस्त जिल्हा गडचिरोली येथे हि कंपनी लोह खनिजाचे उत्खनन करत आहे. या कंपनीने बुधवारी कंपनीचे शेअर्स आपल्या जवळपास 6,000 कर्मचाऱ्यांना वितरित केले. या शेअर्सच्या बदल्यात अत्यंत नाममात्र रक्कम घेण्यात आली. जर आपण शेअर बाजारावर नजर टाकली तर लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सची किंमत सुमारे 1,337, रुपये होती, परंतु कंपनीने हे स्टॉक आपल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे मजुरांना केवळ 4 रुपये प्रति शेअर या अल्प प्रमाणात भेट दिले.
कंपनीने आपल्या कामगारांना स्वस्त दरात शेअर्स देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी LMEL च्या ओडिशा युनिटचे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तुलसी मुंडा आणि दोन आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना शेअर सर्टिफिकेट दिले. कंपनीने तुलसी मुंडा यांना सुमारे 1 कोटी 30 लाखांचे 10 हजार शेअर्स दिले.
तुम्ही कंपनीचे मालक आहात – देवेंद्र फडणवीस
शेअर वाटप कार्यक्रमात कामगारांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही लोक कंपनीचे मालक आहात. यावेळी त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांचे कौतुक केले आणि सांगितले की, जिथे कोणी गेले नव्हते तिथे खाणकाम सुरू करण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे. हे शेअर्स तुम्हाला कंपनीचे मालक बनवतील, असे मुख्यमंत्र्यांनी कामगारांना सांगितले. फडणवीस पुढे म्हणाले की, आणखी पाच वर्षे वाट पाहा, तुम्हाला पाचपट परतावा मिळेल. जर बी प्रभाकरन व्यवस्थापकीय संचालक असतील तर तुम्ही सर्व त्याचे मालक आहात.
किमान 100 शेअर्स मिळाले
कंपनीने अनुभवी आणि दीर्घकाळ काम करणाऱ्या कामगारांना अधिक शेअर्स दिले आहेत. किमान दोन वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना किमान 100 शेअर्स मिळाले आहेत. या समभागांसाठी कोणताही लॉक-इन कालावधी नाही आणि भविष्यात वाटप शक्य आहे, जे कामगिरीवर अवलंबून असेल. LMEL च्या सूरजागढ लोह खनिज खाणीची सध्याची क्षमता 9 दशलक्ष टन आहे, ती वाढवून 25 दशलक्ष करण्याचे नियोजित आहे. कंपनी कोनसारी गावात 24,000-25,000 कोटी रुपयांचा एकात्मिक स्टील प्लांट देखील बांधत आहे.