---Advertisement---

Jalgaon News : जुन्या आरक्षणानुसारच होणार निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह

---Advertisement---

जळगाव : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. दोन दिवसांपूवीच सर्वोच्च न्यायालयाकडून आगामी चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात. या निवडणुका आधीच्या आरक्षणानुसारच घेण्याचे निर्देश देण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आशेचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

जिल्ह्यातून जळगाव महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर गेल्या साडेचार-पाच वर्षांपासून प्रशासक कारभार पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याच्या आदेशामुळे राज्यासह जळगाव जिल्हा परिषद, जळगाव महानगरपालिका, १८ नगरपालिका व १५ पंचायत समिच्या सार्वत्रिक निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात भुसावळ, सावदा, फैजपूर, यावल, रावेर, म क्ताईनगर, वरणगाव, चोपडा, पारोळा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, जामनेर, बोदवड आणि नशिराबाद अशा १९ नगरपालिका, परिषदा आहेत. यात फक्त बोदवड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २०२१ मध्ये झाली असून तेथे सदस्य कार्यकाळ शिल्लक आहे.

नशिराबाद नगरपंचायत २०२०-२१ दरम्यान अस्तित्वात येऊन सार्वत्रिक निवडणूक झालेली नसत्याने प्रशासक नियुक्त आहेत. तर अन्य १७ नगरपालिका वा नगर परिषदांमध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्ण होऊन आरक्षणावर निर्णय प्रलंबिततेमुळे सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्याहोत्या. या ठिकाणी मुख्याधिकारी तसेच प्रांताधिकारी हे प्रशासक आहेत. तर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका २०१७ मध्ये होऊन त्यांचा पंचावार्षिक कार्यकाळ २०२२ मध्ये संपुष्टात आला. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आरक्षण निर्णयाअभावी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून कार्यरत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जळगाव महानगरपालिकेसह जळगाव जिल्हा परिषद, १५ तालुका पंचायत समिती, १७ नगर परिषदा व नव्यानेच नगरपंचायत म्हणून नशिराबाद येथे सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

जळगाव जिल्हा परिषदेत गट आणि गणांची संख्या

जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणात लोकसंख्या जनगणनानिहाय प्रारूप प्रभागनिहाय वाढ झाली आहे. २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान ६७ गट आणि १३४ गण होते. त्यात जून २०२२ मध्ये नवीन प्रारूप प्रभाग होऊन ६७ ऐवजी ७७ गट आणि १३४ ऐवजी १५४ गण यानुसार प्रत्येकी १० गट आणि २० गण अशी वाढ झाली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment