Lok Sabha Election 2024: आप-काँग्रेसमध्ये ठरलं! दिल्ली, गुजरात, हरियाणामध्ये एकत्र,पण पंजाबमध्ये….

India Alliance: देश्यासह राज्यातील निवडणूक का आता जवळ आल्या आहेत. त्याचप्राणे सर्व पक्ष व पक्ष्यातील नेते निवडणुकीसाठी जोरदार तयारी करतांना दिसत आहे. भाजपच्या विरोधी पक्षांनी यावेळी विजय मिळविण्यासाठी नवीन रणनीती तयार केली आहे या रणनीतीनुसार, विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया अलायन्स’ स्थापन केला आहे जो सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यात आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि चंदीगडमध्ये एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पंजाबमध्ये दोन्ही पक्षांचे मार्ग वेगळा राहणार आहे. परस्पर संमतीने आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे दोन्ही पक्षांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना काँग्रेस नेते मुकुल वासनिक म्हणाले की, काँग्रेस हरियाणातील 9 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर आम आदमी पक्ष कुरुक्षेत्र मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. यासोबतच काँग्रेस चंदीगडमध्येही आपले उमेदवार उभे करणार आहे.

काँग्रेस नेते मुकुल वासनिक म्हणाले की, आप दिल्लीतील लोकसभेच्या चार जागांवर निवडणूक लढवणार आहे – नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली. काँग्रेस चांदणी चौक, ईशान्य आणि उत्तर-पश्चिम या 3 जागांवर निवडणूक लढवणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेस 24 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर भरूच आणि भावनगर या दोन जागांवर आम आदमी पार्टी उमेदवार उभे करणार आहे. तर गोव्यात काँग्रेस लोकसभेच्या दोन्ही जागांवर निवडणूक लढवणार आहे.

आपचे राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले की, दोन्ही पक्षांनी पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये संदीप पाठक व्यतिरिक्त आप पक्षाकडून सौरभ भारद्वाज आणि आतिशी उपस्थित होते. काँग्रेसकडून दीपक बाबरिया, अरविंदर सिंग लवली आणि मुकुल वासनिक उपस्थित होते.