आगामी लोकसभा निवडणुकीच्या बारामती आणि नगर लोकसभेतील उमेदवारी बाबत महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. महायुतीतील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या दोन महत्वाच्या बैठका पार पडल्या. बारामती लोकसभा मतदारसंघातील तिढ्या सोडवण्यासाठी फडणवीसांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. तर, नगर दक्षिणमधील वाद मिटवण्यासाठी राम शिंदे, सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्यासोबत फडणवीसांची बैठक झाली. दोन्ही मतदारसंघांमधील वाद पक्षीय पातळीवर मिटले असल्याची माहिती, सूत्रांच्या वतीनं मिळत आहेत.
देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट आदेश…
अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीच काम करा, असा सल्ला बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती मिळत आहे. बारामती आणि नगर संदर्भात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यासंदर्भात आदेश दिले आहेत. महायुतीचा उमेदवार विजयी होईल एवढंच बघा, बाकी सगळं बाजूला ठेवा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि विखे-शिंदे बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच, मिशन 45 प्लस यावरच संपूर्ण लक्ष ठेवा. अंतर्गत मतभेदांवरून महायुतीच्या उमेदवारावर परिणाम होता कामा नये, अशी समज देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या बैठकीत दिली आहे.