लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकासह आघाडीच्या प्रश्नांचा तिढा सुटला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेवर अंतिम निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार शिवसेना ठाकरे गट 22, काँग्रेस 16 तर राष्ट्रवादी 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. जर वंचित सोबत आली तर शिवसेनेच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून दोन आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
---Advertisement---