लोकसभा निवडणूक 2024 : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोग लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. 14-15 मार्च दरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकते. पहिल्या टप्प्यातील मतदान एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 2019 प्रमाणे यावेळीही 7 टप्प्यात निवडणुका होऊ शकतात.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत निवडणूक आयोग मंगळवारी (५ मार्च) पत्रकार परिषद घेणार आहे. मात्र, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार का ? हे स्पष्ट झालेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात तारखा जाहीर होऊ शकतात,निवडणूक आयोग पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग सध्या अनेक राज्यांच्या दौऱ्यावर आहे. सर्व राज्यांतील तयारीचे मूल्यांकन केल्यानंतरच आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल.