Lok Sabha Election Result : जळगावसह रावेरात महायुतीची विजयाकडे घौडदौड

Lok Sabha Election Result : जळगाव लोकसभा मतदार संघाच्या १४ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.  रावेर लोकसभा मतदार संघाची नववी फेरी पूर्ण झाली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना नवव्या फेरी अखेर ३ लाख १४ हजार ६५६ मते घेऊन आघाडीवर आहेत. तर श्रीराम पाटील हे १ लाख ८७ हजार २५० मते मिळाली आहेत.

रावेर मतदार संघ रक्षा खडसे चोपडा ५ हजार ५४२, रावेर ३ हजार ३५३, भुसावळ १ हजार ८५५, जामनेर ४ हजार १५३, मुक्ताईनगर ५ हजार १५२, मलकापूर ५ हजार ७४० नवव्या फेरीत २५ हजार ७९५ मते मिळाली आहेत.

श्रीराम पाटील चोपडा ३ हजार १५७, रावेर ४ हजार २७५, भुसावळ ४ हजार ७२१, जामनेर २ हजार ३९८, मुक्ताईनगर १ हजार ५२५, मलकापूर २ हजार ७६८ नवव्या फेरीत १८ हजार ८४४ मते मिळाली आहेत.

जळगाव मतदार संघ 

जळगाव लोकसभा मतदार संघात तेराव्या फेरी अखेर स्मिता वाघ यांना ४ लाख ८४ हजार ४२१  तर करण पवार यांना ३  लाख २ हजार ५२१  मते मिळाली आहेत.

तेराव्या फेरीत स्मिता वाघ यांना जळगाव शहर ५ हजार १७१, जळगाव ग्रामीण ५ हजार ७४८, अमळनेर ४ हजार ४३२, एरंडोल ४ हजार ३२४, चाळीसगाव ३ हजार ३६४, पाचोरा ४ हजार ५२९, तेराव्या  फेरीत २७ हजार ५६८  मते मिळाली आहेत.  महाविकास आघाडीचे करण पवार जळगाव शहर १ हजार ७२४, जळगाव ग्रामीण २ हजार ९०९, अमळनेर २ हजार १२९, एरंडोल ५ हजार ४२५, चाळीसगाव ४ हजार १८९, पाचोरा ४ हजार ५९७, तेराव्या  फेरीत  २० हजार ९७३ मते मिळाली आहेत.