Lok Sabha Election Result : जळगाव, नंदुरबार, रावेरमध्ये ‘मविआ’ आघाडीवर

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचे कल समोर येत असून, जळगाव, नंदुरबार, रावेरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. नंदुरबारमधून गोवाल पाडवी तब्बल २९ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मतदार महायुतीच्या उमेदवारांच्या विकास कामांच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब करणार ? की, महाविकास आघाडीच्या ‘संविधान बचाओ’ नाऱ्याला कौल देणार ? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जळगाव, नंदुरबार, रावेरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. नंदुरबारमधून गोवाल पाडवी तब्बल २९ हजार मतांनी आघाडी घेतल्याची माहिती समोर आली आहे.