Lok Sabha Election Result : जळगाव मतदार संघाची फेरी निहाय आकडेवारी

Lok Sabha Election Result : जळगाव लोकसभा मतदार संघात चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यात तिसऱ्या व चौथ्या फेरीतील विधानसभा क्षेत्र निहाय निकाल पुढील प्रमाणे.

महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना जळगाव शहर ४ हजार ११३, जळगाव ग्रामीण ६ हजार ५९४, अमळनेर ४ हजार ५९४, एरंडोल ४ हजार ७०१, चाळीसगाव ५ हजार ७३, पाचोरा ४ हजार ७३८ तिसऱ्या फेरीत २९ हजार ८१३ मते मिळाली आहेत. स्मिता वाघ यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या चाळीसगाव येथून ५ हजार ७३ मते मिळाली आहेत.

महाविकास आघाडीचे करण पवार जळगाव शहर ४ हजार ४४९, जळगाव ग्रामीण ९४६, अमळनेर १ हजार ५८१, एरंडोल ३ हजार ५१, चाळीसगाव ३ हजार २२८, पाचोरा ३ हजार २९ तिसऱ्या फेरीत १६ हजार २८४ मते मिळाली आहेत. तिसऱ्या फेरी अखेर ८८ हजार ५९३ तर करण पवार ४६ हजार ९८१ मते मिळाली आहेत.

चौथी फेरी स्मिता वाघ यांना जळगाव शहर ४ हजार ९२२, जळगाव ग्रामीण ६ हजार ७६, अमळनेर ५ हजार ३५, एरंडोल ५ हजार १३२, चाळीसगाव ४ हजार ८४४, पाचोरा ४ हजार २२ चौथ्या फेरीत ३० हजार २२ मते मिळाली आहेत.

करण पवार यांना जळगाव शहर २ हजार ८५७, जळगाव ग्रामीण २ हजार ७८२, अमळनेर १ हजार ९०१, एरंडोल ३ हजार ७८२, चाळीसगाव ३ हजार २००, पाचोरा ३ हजार ५४ चौथ्या फेरीत १७ हजार ५७६ मते मिळाली आहेत.

चौथ्या फेरी अखेर करण पवार यांना ६४ हजार ५५७ तर स्मिता वाघ यांना १ लाख १८ हजार ६१५ मते मिळाली आहेत. स्मिता वाघ यांनी ५४ हजार ५८ मतांनी आघाडी घेतली आहे.