Lok Sabha Election Result : जळगाव, रावेर मतदार संघात महायुती आघाडीवर आहे. जळगावात स्मिता वाघ यांनी 50 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 1 लाख 48 हजार 851 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना 78 हजार 400 मते मिळाली आहेत. स्मिता वाघ 70 हजाराची आघाडीवर आहेत.
जळगाव लोकसभा मतदार संघात स्मिता वाघ व करण पवार यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. जळगाव मतदार संघात मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडनू आले होते. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे. त्यांना करण पवार यांच्या पेक्षा दुप्पट मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी स्मिता वाघ 70 हजाराची आघाडीवर आहेत.
रक्षा खडसे यांना 1 लाख 45 हजार 769 मते मिळाली असून श्रीराम पाटील यांना 78 हजार 582 मते मिळाली आहेत. रक्षा खडसे यांनी 67 हजार 187 मतांनी आघाडी घेतली आहे. रक्षा खडसे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे. रक्षा खडसे यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे श्रीराम पाटील हे पिछाडीवर आहेत. रक्षा खडसे व श्रीराम पाटील यांच्यात होणारी लढत मोठी रंजक ठरेल अशी चर्चा मतदार संघात रंगली आहे. जळगाव व रावेर मतदार संघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.,