Lok Sabha Election Result : जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाले आहे. आज मंगळवार ४ जून रोजी टपाली मतदानाची मतमोजी सुरु झाली आहे. दोन्ही मतदार संघात महायुती यांच्या विरोधात महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत पाहावयास मिळाली आहे.
महायुतीकडून भारतीय जनता पक्षाच्या रक्षा खडसे ह्या सलग तिसऱ्यांदा आपली नशीब अजमावत आहेत. त्यांच्या विरोधात उद्योजक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील हे लढत देत आहे. पहिल्या फेरती रक्षा खडसे यांनी आघाडी घेतली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून महायुतीतर्फे स्मिता वाघ ह्या लढत देत आहेत. त्यांना मागील लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना संधी देण्यात आली होती. २०२४ च्या लोकसभेसाठी पुन्हा एकदा स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
रावेर मतदार संघात रक्षा खडसे ह्या तिसऱ्यांदा लढत देत आहेत. त्यांनी पहिल्या फेरी नंतर आघाडी घेतली आहे. त्या, ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत टिकावून ठेवतील अशी चर्चा जाणकारांमध्ये रंगली आहे. रावेर मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. यात रक्षा खडसे यांनी सलग दोन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
जळगाव व रावेर या दोन्ही मतदरसंघाच्या पोस्टल मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. यात जळगाव मतदार संघात 5 हजर 479 तर रावेर मतदार संघात 2 हजर 789 मतदान झाले आहे. यात रावेरमधून रक्षा खडसे ह्या आघाडीवर आहेत.