Lok Sabha Election Result : विजयाच्या हॅट्रिकनंतर रक्षा खडसे यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाल्या…

Lok Sabha Election Result : जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे नेते अमित शहा, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, त्याच प्रमाणे घटक पक्षाचे नेते एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सर्व घटक पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आरएसएस परिवार, बजरंग दल याच प्रमाणे मदत केलेल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद अशी प्रतिक्रीया रावेर लोकसभा महायुतीचे उमेदवार खा. रक्षा खडसे यांनी दिली आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघातील दोन्ही जागांवर महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे आणि स्मिताताई वाघ हे मोठ्या लीडवर निवडून आले आहे.  त्या  जी.एम.फाऊंडेशन येथील भाजपा संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेत बोलत होत्या.

रक्षा खडसे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली दहा वर्षात जनतेशी संपर्क ठेवत त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या. याच परिणाम निकालाच्या स्वरूपात दिसत आहे. जनतेने मला आशीर्वाद देऊन मतदानाच्या माध्यमातून निवडून दिले आहे.  त्यांच्या विश्वासाला अजून चांगल्या पद्धतीने या येणाऱ्या पाच वर्षात कसं काम करेल याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न होते.  आज अपेक्षापेक्षा जास्त लीड मला मिळालेला आहे त्याचा आनंद आहे.  शेवटी निवडून देणारा हा मतदार असतो आणि तिकीट मिळून देण्यासाठी पण मतदारांचे योगदान खूप मोठे माझ्या मतदारसंघांमध्ये राहिले. नेत्यांचे कार्यकर्त्यांची खूप प्रयत्न राहिलेले आहे.  प्रामुख्याने महिलांचा मनापासून अभिनंदन करेल. आगामी पाच वर्षांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील.

मागच्या दहा वर्षांमध्ये आदरणीय मोदी साहेबांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचं तर काम केलेला आहे. ग्रामीण भागापर्यंत पोहोचायचं काम केलेला आहे. महिलांनी  प्रामाणिकपणे जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. आम्हास दोघा महिला उमेदवारांना त्याचा फायदा झाला. सिंचनावर ह्या वेळेस आम्ही जास्त भर देणार. यासह अनेक विषय आहे यात  महिला, शेतकरी,रोजगार असे अनेक विषय आहेत.  मी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नेहमी आधीपासून प्रयत्न केलेला आहे.  त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन माझं पुढचं भविष्य मी ठरवलेला आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील निवडणुकीत मदत केली. माझा विजयात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला आहे. प्रत्येकाने आपल्यातील जबाबदारी समजून या राष्ट्रीय निर्मितीसाठी आदरणीय मोदी साहेबांना या देशाचे प्रधानमंत्री बनवण्यासाठी प्रत्येकाने कार्य केले आहे. प्रत्येकाचे योगदान या सगळ्या निवडणुकीमध्ये राहिलेला आहे.