Lok Sabha Election Result : स्मिता वाघ यांची निर्णायक आघाडी

Lok Sabha Election Result :  जळगाव लोकसभा मतदार संघाच्या १६ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यात १५ व्या फेरीत जळगाव लोकसभा महायुतीच्या स्मिता वाघ यांना ५ लाख ६७ हजार २३८  तर महाविकास आघाडी करण पवार यांना ३ लाख ६२ हजार ७२३ मते मिळाली आहेत. स्मिता वाघ यांनी  2 लाखांची आघाडी घेतली आहे.

सोळाव्या फेरीत स्मिता वाघ यांना जळगाव शहर ६ हजार ४०७, जळगाव ग्रामीण ५ हजार १६६, अमळनेर ५ हजार ९५५, एरंडोल ३ हजार ७६२, चाळीसगाव ३ हजार २७२, पाचोरा ३ हजार २२०, तेराव्या  फेरीत २७ हजार ७८२  मते मिळाली आहेत.  महाविकास आघाडीचे करण पवार जळगाव शहर १ हजार ७६७, जळगाव ग्रामीण ३ हजार ५७७, अमळनेर १ हजार ८८७, एरंडोल ३ हजार ९८६, चाळीसगाव ५ हजार २५५, पाचोरा २ हजार ७८१, अशा प्रकारे सोळाव्या फेरीत  १९ हजार २५३ मते मिळाली आहेत.

सतरावी फेरी  स्मिता वाघ यांना जळगाव शहर ४ हजार ५८८, जळगाव ग्रामीण ५ हजार ८६६, अमळनेर ४ हजार ६४०, एरंडोल ३ हजार ८९५, चाळीसगाव ३ हजार ६०, पाचोरा ४ हजार २१८, सतरावी फेरीत २६ हजार २६७  मते मिळाली आहेत.  महाविकास आघाडीचे करण पवार जळगाव शहर १ हजार ५११, जळगाव ग्रामीण ३ हजार ३५७, अमळनेर १ हजार ४२६, एरंडोल ४ हजार ५४२, चाळीसगाव ४ हजार ९३८, पाचोरा ३ हजार १०७, अशा प्रकारे सतराव्या फेरीत  १८ हजार ८८१ मते मिळाली आहेत.