जळगाव : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यात रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यात सगळ्यात जळगाव व रावेर लोकसभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार बुधवार, २४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीतर्फे मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
महाविकास आघाडीने करण पाटील यांना जळगावातून तर श्रीराम पाटील यांना रावेरातून मैदानात उतरवले आहेत. दोन्ही उमेदवारांनी गाठीभेटींसह मेळाव्याच्या माध्यमातून प्रचार सुरू देखील केलेला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात मंगळवार, २४ रोजी मविआचे दोन्ही उमेदवार आपापला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या पक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना-उबाठाचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती याप्रसंगी लाभणार आहे. तर, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खर्या अर्थाने प्रचारात रंग भरणार आहेत.