लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवारी मिळविणे, प्रचार तंत्र अवलंबून निवडून येणे यासारखे आराखडे आखात आहे. त्यातच तामिळनाडूत एका पोपटावरून राजकीय घमासान होत असल्याचे दिसून येत आहे. पोपटाने उमेदवाराचे भवितव्य सांगितल्याने हा प्रकार समोर आला आहे. यानंतर पोलिसांनी पोपटाच्या मालकाला ताब्यात घेतलं होतं.
‘पीएमके’चे उमेदवार थंकर बचन हे लोकसभा निवडणूक लढवीत आहे. या निवडणुकीत तेच विजयी होतील अशी भविष्यवाणी पोपटाने केली आहे. या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमके अर्थात पट्टाली मक्कल काची या पक्षाचे कुड्डलोर मतदारसंघाचे चित्रपट दिग्दर्शक शंकर बचन हे कुड्डलोर मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. थंकर रविवारी आपल्या मतदारसंघात प्रचार दौरा करीत होते. ते यादरम्यान एका मंदिरापासून जात असतांना त्यांना मंदिराच्या बाहेर ज्योतिषी पोपटच्या मदतीने कार्ड काढून भविष्य सांगत असल्याचे नजरेस पडले. थंकर यांनीही आपलं भविष्य या पोपटाकडून जाणून घेतलं. याप्रसंगी त्यांचे समर्थकदेखील सोबत होते. या पोपटाच्या समोर विविध कार्डस् होते. त्यातील एक कार्ड पोपटाला निवडायचं होतं. त्यानुसार पोपटाने एक कार्ड आपल्या चोचीमध्ये उचललं. कार्डवर त्या मंदिरातील देवतेचा फोटो होता. कार्डवरचा मजकूर बघतिल्यानंतर पोपटाच्या मालकाने थंकर बचन हे विजयी होतील, अशी भविष्यवाणी केली. ही भविष्यवाणी ऐकून पीएमके उमेदवारांनी पोपटाला खाऊ दिला. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोपटाचा मालक ज्योतिषी सेल्वराज आणि त्याच्या भावाला काही वेळासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं.