Loksabha Election 2024 : भाजपकडून कुणाला संधी, कुणाचा पत्ता कट ? पहा यादी….

Loksabha Election 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. महाराष्ट्रातील २० नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. भाजपने विद्यमान ४ खासदारांचा पत्ता कट केला आहे.

बीड लोकसभा प्रीतम मुंडे ऐवजी पंकजा मुंडे

पुणे लोकसभा मुरलीधर मोहोळ

चंद्रपूर लोकसभा सुधीर मुनगंटीवार

जळगाव लोकसभा उन्मेश पाटील ऐवजी स्मिता वाघ

अकोला लोकसभा अनुप धोत्रे

उत्तर मुंबईमधून लोकसभा गोपाळ शेट्टी ऐवजी पियूष गोयल

उत्तर पूर्व मुंबई मनोज कोटक ऐवजी मिहीर कोटेजा

भाजपने नंदुरबारमधून डॉ. हिना विजयकुमार गावित, धुळ्यातून सुभाष रामराव भामरे, जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा निखिल खडसे, अकोल्यातून अनुप धोत्रे, वर्धामधून रामदास चंद्रभानजी तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे.

नांदेडमधून प्रतापराव पाटील, जालन्यातून रावसाहेब दादाराव दानवे, दिंडोरीतून भारती प्रवीण पवार, भिवंडीतून कपिल मोरेश्वर, मुंबई उत्तरमधून पियुष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर किशन होहोळ, अहमदनगरमधून सुजय राधाकृष्ण विखे पाटील, बीडमधून पंकजा मुंडे, यांना उमेदवारी दिली.

लातूरमधून सुधाकर तुकाराम श्रंगारे, माढा येथून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सांगलीतून संजयकाका पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे.