---Advertisement---

जळगावात प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा, चिमुकले राम मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

---Advertisement---

जळगाव : देशभरात आज रविवारी राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जळगावातील चिमुकले राम मंदिरातही प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

या वेळी दादा महाराज यांच्या वाणीतून कीर्तनाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. दादा महाराज जोशी यांच्यासह जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते पाळणा हलवून राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. तसेच प्रभू श्री रामचंद्र की जय घोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता.

सुंदरकांड वाचन

जळगाव : श्रीरामनवमीनिमित्त (Ram Navami 2025) संभाजीनगरातील दत्त मंदिरात आज रविवारी रोजी सायंकाळी साडेसहाला सुंदरकांड वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. भाविकांनी सुंदरकांड श्रवण व प्रसादाचा लाभघ्यावा, अशी विनंती आयोजक श्री दत्त मंदिर परिसर महिला मंडळाने केली आहे.

स्वच्छता अभियान

जळगाव : श्री रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्यानगर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी श्रीराम मंदिर परिसर, मनपा-आरोग्य विभागाच्या मदतीने भाजपाचे माजी नगरसेवक डॉ. वीरेन सुरेश खडके यांनी परिसर स्वच्छ करून घेतला. या वेळी मंडळ अध्यक्ष सुनील सरोदे, संतोष इंगळे, अनिल चौधरी, प्रदीप रोटे, राजेंद्र महाजन, भैरव भंगाळे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

‘गीत रामायण’मधील रचनांनी रसिकांचे वेधले लक्ष

जळगाव : श्रीराम नवमी उत्सवानिमित्त कै. नथ्थू सुपडू चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ व सुर्वे फाउंडेशन यांच्यातर्फे कविवर्य ग. दि. माडगूळकर लिखित ‘गीत रामायण’ मधील स्व. सुधीर फडके यांनी गायलेल्या ५६ रचनांपैकी काही निवडक रचनांचे सादरीकरण स्वरवेध फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत पाटील व शहरातील ज्येष्ठ गायक नीलकंठ कासार यांनी सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली.


Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment