तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव: ७ जानेवारी २०२३ रोजी शनिवारी लव्ह जिहाद विरोधात जळगावात मोर्चा काढण्यात आला. यावेळीसुमारे १५ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग होता . शिवतीर्थ मैदान ते कलेक्टर कचेरी पर्यंत मोर्चातील नागरिकांच्या रांगा होत्या . देशात लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू करण्याची मागणी , धर्मांतरबंदी कायदा लागू करणे, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजाणी करणे तथा जैन बांधवांच्या पवित्र सम्मेद शिखरजीला तीर्थक्षेत्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली.
मोर्चात विविध सामाजिक, धार्मीक संघटना सहभागी झाल्या. भाजप, मनसे व इतरही काही राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही सहभागी झाले. हिंदू जनजागृती समितीने या मोर्चाचे नेतृत्व केले.
डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे ध्वज घेत हर हर महादेव च्या गजरात शीवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. हिंदू संस्कृतीचे महत्व सांगणारा चित्ररथ अग्रभागी होता. पुरूषांबरोबरच महिलांचीी संख्याही उल्लेखनीय दिसून आली. रणरागिणी महिला पथकासह कीर्तनकार, उद्योजक, संत, महंत, धर्माचार्य, पुरोहित, राजकीय पक्षांचे कार्यकर्त्य यात सहभागी झाले. सकल जैन, माहेश्वरी सभा, बहुभाषिक ब्राम्हण संघ, योग वेदांत समिती, स्वामी समर्थ संप्रदाय, गायत्री परिवार, इस्कॉनसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान यासह अन्य विविध संघटनांनी यात सहभाग नोंदविला. बसस्थानक स्वातंत्रचौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मोर्चातील सर्व विषय मुंख्यमंत्र्यापुढे मांडून त्यावर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, प्रशांत जुवेकर, सुनील घनवट यांनी मनोगत व्यक्त केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना देण्यात आले. मोर्चासाठी एका मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. यासह मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता