डेहराडून : लव्ह जिहादच्या घटनेत वाढ झाली आहे. श्रीनगरमध्ये पुन्हा लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. हिंदू मुलीला पळवूननेण्याचा प्रयत्न मुजीब खान नावाच्या २२ वर्षीय तरुणाने केला आहे. त्यामुळे घटनेनंतर गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
घटनेच्या निषेधार्थ गाठले पोलीस स्टेशन
या घटनेच्या निषेधार्थ श्रीनगरमधील स्थानिक लोक आणि व्यावसायिकांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठले. यावेळी स्थानिक लोक तसेच व्यापारी आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी आरोपीला पकडण्यापूर्वीच तो पळून गेला, असे त्याने पोलिसांना सांगितले. लव्ह जिहाद सारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाही असे ही स्थानिक नागरिक व भाजपा म्हणाले.
तसेच आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी पोलीसांकडे केली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लखपत सिंह भंडारी म्हणाले की, एका विशिष्ट समाजाचे लोक बाहेरून मोठ्या संख्येने उत्तराखंडमध्ये पोहोचत आहेत. व उत्तराखंडाचे शांततेचे वातावरण खराब करत आहे.अश्या लोकंन वर लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप करून करण्यात आली आहे.
श्रीनगर कोतवालीचे प्रभारी निरीक्षक म्हणाले की, लिखित स्वरुपात तक्रार मिळाल्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच राखण्यासाठी आणि वातावरण बिघडू या साठी कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे . या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपी मुजीब खान आणि त्याच्या वडिलांना उत्तर प्रदेशमधील बदाऊन येथून अटक केली आहे. तसेच आरोपींवर धर्मांतर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय आरोपी तरुणावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुजीब आणि त्याचा ४५ वर्षीय अबू बाबू खान यांना न्यायालयात हजर केले, तेथून दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आले.