---Advertisement---

लव्ह जिहादचा खुनी खेळ थांबवा

by team
---Advertisement---

पाचोरा : लव्ह जिहादचा खुनी खेळ थांबवा, आंतरधर्मीय विवाहावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी पाचोरा तालुका जिल्हा जळगाव विश्व हिंदू परिषद, बजरंग दल महिला विभाग व मातृ सक्ती यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली येथे कुमारी श्रध्दाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमीष दाखवून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणार्‍या अफताबने श्रध्दाने लग्नाची मागणी करताच घरातच तीच्या शरीराचे क्रूर पध्दतीने 35 तुकडे करुन मोठा फ्रीज खरेदी करुन त्यात ठेवले. सहा महिन्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. ही घडलेली घटना क्लिष्ट असूनही दिल्ली पोलीसांनी याचा शोध लावून नराधमाला अटक केली. याबाबत दिल्ली पोलीसांचे अभिनंदन तसेच देशभरात श्रध्दासारख्या हजारो निष्पाप मुलींचे जीव क्रूरपणे चिरडले जात आहेत. श्रध्दाचे 35 तुकडे करणार्‍या नराधमास कठोर शिक्षा देण्यात व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे व बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment