LPG Price । ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी दणका, गॅस सिलिंडर महागला, नवा दर काय ?

LPG Price ।  एलपीजी सिलिंडरचे नवे दर आज जाहीर करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीपासून ते चेन्नई, मुंबई आणि कोलकत्ता या मोठ्या शहरांपर्यंत एलपीजी गॅस सिलिंडर महागला आहे.

19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. तर 14 किलोच्या गॅस सिलेंडरमध्ये कुठलाही बदल झाला नाही. सणासुदीत गॅस सिलेंडरचा भाव वधारल्याने व्यावसायिकांना झटका बसला आहे.

आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून 19 किलो वजनाचा LPG सिलिंडर मुंबईत शहरात 1644 रुपये झाला आहे. अगोदर हा दर 1605 रुपये होता. चेन्नई शहरात सिलेंडरची किंमत 1903 रुपये झाली आहे.

पूर्वी ही किंमत 1855 रुपये होती. तर दिल्लीत या किंमती 1740 रुपयांवर पोहचल्या आहेत. कोलकत्ता शहरात सप्टेंबर महिन्यात गॅस सिलेंडरची किंमती 1802.50 रुपये होते. आता ही किंमत 1850.50 रुपये आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाला का ?
1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाले आहेत. 14 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल दिसला नाही. सध्या दिल्लीत एका सिलेंडरची किंमत 803 रुपये, कोलकत्तामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईत हा भाव 818.50 रुपये इतका आहे.