---Advertisement---

अश्लिल हावभाव केले, पकडला महिलेचा हात; जळगावातील घटना

---Advertisement---

जळगाव : अश्लिल हावभाव करत २३ वर्षीय महिलेचा दोन विधीसंघर्षीत मुलांनी विनयभंग केला. हा प्रकार हा प्रकार शनिवार, १३ रोजी दुपारी १२.३० वाजता घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विधी संघर्ष बालका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील एका भागात २३ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता ही महिला घरी असताना त्याच भागात राहणारे दोन अल्पवयीन मुलांनी महिलेकडे पाहून अश्लिल हावभाव केले. तसेच एकाने महिलेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार विधीसंघर्षित असलेल्या दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment