खजुराहो : आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली, काँग्रेसने फक्त सनातन धर्माचा अपमान केला असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा आज मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. खजुराहो येथे भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, आम्ही दिलेली सर्व आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मध्य प्रदेशातील खजुराहो येथे पोहोचले आहेत. मुरैना, भिंड, गुना आणि ग्वाल्हेर-चंबळ क्लस्टरच्या चार लोकसभा जागांच्या बूथ व्यवस्थापन समितीच्या सुमारे 400 नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. भाजप बूथ कमिटीच्या परिषदेत बोलताना ते म्हणाले की, ही परिषद विजयाची शपथ घेण्यासाठी आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यापासून ते अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे दिलेले आश्वासन भाजपने पूर्ण केले आहे. आम्ही लष्करासाठी वन रँक, वन पेन्शनचे आश्वासन दिले होते आणि ते आम्ही पूर्ण केले.
विरोधकांवर निशाणा साधताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच सनातन धर्माचा अपमान केला आहे. त्यांचे नेतेही अनेकदा सनातन धर्माच्या विरोधात वक्तव्ये करतात. तर मोदीजींनी सनातनला जगभर प्रगत करण्याचे काम केले आहे. येणारी निवडणूक ही भारताला महान बनवण्याची आपली निवडणूक आहे. पुढची निवडणूक भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करणार आहे. त्यामुळे खासदारकीच्या सर्व जागांवर कमळ फुलवायचे आव्हान त्यांनी जनतेला केलं.
या बैठकीला उपस्थित असलेल्या स्थानिक भाजप नेत्याने शहा उद्धृत केले की प्रत्येक मत पक्षासाठी महत्त्वाचे आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना मागील निवडणुकीच्या तुलनेत प्रत्येक बूथवर 370 अतिरिक्त मतांची खात्री करण्यास सांगितले आहे.