---Advertisement---

Jalgaon News : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादवांचे जळगाव विमानतळावर स्वागत

---Advertisement---

जळगाव : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे आज दुपारी 4.10 वाजता विशेष विमानाने जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपस्थित होते.

मुख्यमंत्री यादव यांचे औपचारिक स्वागत झाल्यानंतर त्यांनी पुढील प्रवासासाठी जळगाव विमानतळावरून हेलिकॉप्टरने बुरहानपूरकडे ( मध्यप्रदेश ) प्रस्थान केले. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी वेळेआधीच पूर्ण केली होती.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा

जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 21 एप्रिल, 2025 रोजी रात्री 8.00 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव येथून शासकीय वाहनाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, रात्री 8.20 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व राखीव, रात्री 8.50 वाजता जळगाव येथून विमानाने मुंबई कडे प्रयाण.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment