मध्य प्रदेश: बसला लागली भीषण आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री डंपर ट्रकला धडकल्यानंतर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.  या आगीत 13 जणांचा होरपळून झाला आहे. या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुना-आरोन रोडवर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका डंपरने एका प्रवासी बसला धडक दिली. यानंतर बस पलटी होऊन त्यात आग लागली

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मोहन यादव यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, “गुना ते आरोनला जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याने प्रवाशांचे नुकसान झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या हृदयद्रावक अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. या दु:खाच्या परिस्थितीत राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे

बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

 

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, “घटनेची माहिती मिळताच मी जिल्हाधिकारी आणि एसपी (पोलीस अधीक्षक) यांच्याशी बोललो आणि त्यांना मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले.