महाविकास आघाडीतील जागा वाटप जाहीर : जळगाव शिवसेना तर रावेर राष्ट्रवादी लढविणार

मुंबई : महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत जागा वाटप जाहीर करण्यात आली. यामध्ये काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट १० तर शिवसेना (ठाकरे गट) २१ जागा लढवणार आहे. जळगाव शिवसेना , रावेर राष्ट्रवादी तर काँग्रेस धुळे, नंदुरबारची जागा लढणार आहे. पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर घटकपक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत यावेळी उपस्थित होते.

शिवसेना या जागांवर देणार उमेदवार
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण डोंबिवली, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई

राष्ट्रवादी या जागांवर देणार उमेदवार
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड

काँग्रेस या जागांवर देणार उमेदवार
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमुर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई