जळगाव : राज्यात महाविकास आघाडी एकोप्याने विधानसभेच्या निवडणुका लढविणार आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने जागा वाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. परंतु, आगामी काळात विधानसभेत शंभर टक्के सत्ता येणार असल्याची ग्वाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रविंद्र भैयया पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ.सतीश अण्णा पाटील, महिला प्रदेशच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे, श्रीराम पाटील, महागराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी आ. अरुण पाटील, बी. एस. पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, वाल्मीक पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
अनिल देशमुख पुढे म्हणाले की, शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांच्यात चांगला समन्वय असल्याने निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असे सांगून देशमुख यांनी भाजपावर टिका केली.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, गेल्या रा.कॉं.च्या बैठकीत जिल्हाध्यक्ष बदलाची चिंतन बैठक होऊन एकमुखाने बदलाची भूमिका घेतली होती. परंतु, या बदलाची भूमिका वरच्या स्तरावर सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे तीन महिने राहिले आहे. त्यासाठी खऱ्या मेहनती आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा जिल्हाध्यक्ष हवा, सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून सत्ता मिळविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील म्हणाले की, जिल्हाध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याला संधी हवी. विधानसभेला केवळ तीन महिने राहिले आहे.त्यासाठी कार्यकर्त्यांना बदल हवा, असेही सांगितले.
या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बदलाच्या मागणी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून भूमिका मांडली. त्यात बहुतांश पदाधिकारी यांनी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची आपले मत मांडले. त्यात नितीन तावडे-पाचोरा, रमेश पाटील-जामनेर, अशोक सोनवणे, शालिग्राम मालकर, ईश्वर रहाणे, सचिन पाटील, किशोर खोडके, किसनराव जोर्वेकर, डॉ. मनोहर पाटील, अकबर खाटीक, विकास पवार यांनी मनोगत व्यक्त केले.