लखनौ : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील इज्जत नगर येथील गोपेश्वर नाथ मंदिरात मूर्तीची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. शाहरुख, अर्शद आणि अक्रम अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना बरेली पोलिसांनी अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना रविवार, दि. २१ जुलै २०२४ घडली. आरोपींनी मंदिरात घुसून देवी-देवतांच्या मूर्ती फोडल्या. तोडफोडीनंतर दोन संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले, तर अक्रमला जमावाने पकडले, बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी अक्रमला जिल्हा रुग्णालयात दाखल करून नंतर अटक केली. या प्रकरणाबाबत एसपी म्हणाले की त्यांनी शाहरुख आणि अर्शद यांना नंतर अटक केली आणि आयपीसी कलमाखाली एफआयआर नोंदवला. पुढील तपास सुरू आहे. उल्लेखनीय आहे की, यापूर्वी पंजाबमधील लुधियाना येथील एका हिंदू मंदिरात तोडफोडीची घटना घडली होती. महादेवाच्या मंदिरावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून १४ मूर्तींची मोडतोड करण्यात आली आहे. यासोबतच शिवलिंगही उखडले आहे.
याशिवाय मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात असलेल्या पीपलेश्वर महादेव मंदिरातही तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अज्ञातांनी मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून शिवलिंग उपटून रस्त्यावर फेकले. याशिवाय उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या मंदिरातही तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. चौबेपूर येथील दुबकियां गावात असलेल्या हनुमान मंदिरातील मूर्तींची तोडफोड करण्यात आली. त्याचा त्रिशूळ उपटून फेकला.