त्रिवेणी संगमातील तिसऱ्या नदीचे गूढ काय?

#image_title

जगातील सर्वांत मोठा धार्मिक महोत्सव अर्थात् महाकुंभमेळा प्रयागराजमध्ये सुरू आहे. महाकुंभात स्नान आणि उपासना केल्याने विलक्षण पुण्य प्राप्त होते, अशी आख्यायिका आहे. यामुळेच महाकुंभात सहभागी होणारे त्रिवेणी संगमात डुबकी मारतात. महाकुंभात पृथ्वीवरील सर्वांत मोठे पात्र पाहायला मिळते. हे रहस्य आहे त्रिवेणी संगमाचे. प्रयागमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. प्रयाग येथे गंगा आणि यमुना यांचा संगम सर्वांना दिसतो, पण सरस्वती नदीचे प्रत्यक्षात अस्तित्व दिसून येत नाही. सरस्वती नदी अदृश्यपणे वाहत प्रयागला पोहोचते आणि इथे आल्यावर गंगा आणि यमुनेसोबत त्रिवेणी संगम होतो, असा दावा केला जातो. संशोधकांना सरस्वती नदीच्या अस्तित्वाबाबत जे पुरावे सापडले आहेत, ते अचंबित करणारे आहेत.

पुराणात गंगा, यमुना, सरस्वती नदीचा उल्लेख होतो. गंगा आणि यमुना नद्या अस्तित्वात आहेत. सरस्वती नदीचे कुठेही अस्तित्व सापडत नाही. सरस्वती नदीचा उगम उत्तरांचलच्या रुपण ग्लेशिअरमध्ये होत होता. तिथून ही नदी हरयाणा, राजस्थानातून वाहत होती. कालांतराने झालेल्या भूगर्भीय बदलांमुळे नदी राजस्थानात लुप्त झाल्याची कथा आहे. सरस्वती नदीच्या अस्तित्वाचे वैज्ञानिक अंगाने कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.

सरस्वती नदीबाबतचे वैज्ञानिक सत्य

सरस्वती नदीचा इतिहास ५५०० वर्षे जुना आहे. सरस्वती नदी भारतीय उपखंडाच्या उत्तर- पश्चिम भागातून वाहायची.हिमालयात सरस्वती नदीचा उगम झाला. पंजाब, हरयाणा, पश्चिम राजस्थान आणि गुजरातमधून पश्चिमेला सिंधू नदी आणि पूर्वेला गंगा नदीच्या दरम्यान ही नदी वाहत गेली. शेवटी कच्छच्या आखातात अरबी समुद्रात ही नदी विलीन झाल्याचा दावा काही संशोधक करतात. सरस्वती नदीचा उगम आणि तिच्या गायब होण्याच्या संभाव्य कारणांचा सखोल अभ्यास केला आहे. यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एकेकाळी वायव्य भारत आणि पाकिस्तानातून वाहणाऱ्या या नदीचे वास्तविक पुरावे भूवैज्ञानिकांना मिळाले आहेत. होलोसीन युग (गेली ११,७०० वर्षे) दरम्यान ही नदी अस्तित्वात होते. २८ हजार वर्षापूर्वी ही नदी अस्तित्वात होती. पृथ्वीच्या अंतर्भागाच्या रचनेत झालेल्या बदलामुळे सरस्वती भूगर्भात नष्ट झाल्याचा दावा केला जातो.