---Advertisement---

Maharashtra Assembly Eection 2024 | अडावदला ६६ टक्के मतदान

by team
---Advertisement---

अडावद, ता.चोपडा | विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीसाठी अडावद येथील १९ मतदान केंद्र तर उनपदेव येथील एक अशा एकूण २० मतदान केंद्रावर १९ हजार ७२ मतदारांपैकी १२ हजार ६२८ स्त्री पुरुष मतदारांनी आपला हक्क बजावित ६६.२१ टक्के मतदान केले. कुठलाही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखीत नागरिकांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले.

आज सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रावर मतदारांचा एकसारखा ओघ सुरु होता. महाजन विद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक २२५ वर ९२६ मतदारांपैकी तब्बल ७०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावित ७६.४५ टक्के एवढे विक्रमी मतदान नोंदविले. तर जि. प. उर्दू शाळेतील मतदान केंद्र क्रमांक २१७ वर १४२६ पैकी अवघ्या ८६८ मतदारांनी फक्त ६०.८६ टक्के एवढे सर्वाधिक कमी मतदान नोंदविले. तर उनपदेव येथील आदिवासी भागातील मतदान केंद्र क्रमांक २१५ वर ५५२ पैकी ३६८ मतदारांनी ६६.६६ टक्के एवढे मतदान केले.

निवडणुक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, सहाय्यक निवणुक अधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी विरेंद्र राजपूत, बालाजी दहिफळे, तलाठी विजेंद्र पाटील यांनी निवडणुकीचे काम पाहिले. तर सपोनि प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राजु थोरात, भरत नाईक, सतिष भोई, शेषराव तोरे, सर्व पोलीस कर्मचारी यांच्यासह केंद्रित राखीव पोलीस दलाचे जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment