Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली उमेदवारांची तिसरी यादी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन विविध २२ तारखेपासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आपआपले उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केलेल्या यादीत १३ उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०० ते २२५ जागांवर आपले उमेदवार देण्याची तयारी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिसऱ्या यादीत शहादामधून आत्माराम प्रधान, नाशिक पश्चिममधून दिनकर धर्माजी पाटील, अमरावतीमधून पप्पू ऊर्फ मंगेश पाटील, परळीतून अभिजित देशमुख, अहमदपूर-चाकूरमधून नरसिंग भिकाणे, भिवंडीतून वनिता शशिकांत कथुरे, विक्रमगडमधून सचिन रामू शिंगडा, पालघरमधून नरेश कोरडा, भिवंडीतून पप्पू उर्फ ​​मंगेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तसेच वडाळ्यातून स्नेहल सुधीर जाधव, कुर्ल्यातून प्रदीप वाघमारे, ओवळा-माजिवडामधून संदीप पाचंगे, गोंदियातून सुरेश चौधरी आणि पुसदमधून अश्विन जैस्वाल यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात मुंबई मधील १६ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधान सभेच्या २८८ पैकी जवळपास २०० ते २२५ जागा लढविण्याचा निर्धार केला आहे.

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना माहीम विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत अर्थात २०१९ मध्ये वरळीत शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे हे उमेदवारी करत असल्याने मनसेने आपला उमेदवार दिला नव्हता. असे असले तरी अमित ठाकरे उभे असलेल्या वरळी मतदार संघांत शिवसेना उबठाने  संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच या मतदार संघांत महायुतीचा देखील उमेदवार असणार आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गट किंवा भाजपा आपला उमेदवार देणार आहे. यातून वरळीतील ही निवडणूक महाराष्ट्रात तिरंगी व लक्षवेधक ठरणार आहे.