Maharashtra Assembly Election : लॉरेन्स बिश्नोईला ‘या’ पक्षाकडून थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची ऑफर!

#image_title

Maharashtra Assembly Election, Lawrence bishnoi : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला बिश्नोई टोळीकडून वारंवार धमक्या मिळत आहेत. काळवीट शिकार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे हात धुवून लागला आहे. बिश्नोई टोळीकडून सलमानला वारंवार धमक्या मिळत आहे. यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर आता देशभरात पुन्हा एकदा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आल आहे.  लॉरेन्स बिश्नोई आता राजकारणात एन्ट्री करतो की काय? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.  लॉरेन्स बिश्नोई याला आता थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर आली आहे. 

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष सध्या उमेदवारी यादी घोषित करण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे ८ दिवस शिल्लक आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपांसाठी बैठका सुरू आहेत. त्यातच आता एका पक्षाने थेट कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईला आपल्या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी ऑफर दिली आहे. उत्तर भारतीय विकास सेना नावाने नोंदणीकृत असलेल्या एका पक्षाने थेट लॉरेन्स बिश्नोईला निवडणूक लढण्याची ऑफर दिली आहे. 

उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी थेट पत्र लिहून लॉरेन्स बिश्नोईला महाराष्ट्रातून निवडणुकीची ऑफर दिली. सुनील शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत निवडणूक लढण्यासाठी आपल्या ४ उमेदवारांची यादी फायनल झाली आहे. त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोईच्या परवानगीनंतर उर्वरीत ५० उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. या पत्रामध्ये असंही म्हटलं आहे की, “आम्हाला गर्व आहे की तुम्ही पंजाबमध्ये जन्मलात, उत्तर भारतीय आहात, आम्ही उत्तर भारतीय सेना नावाने एक नोंदणीकृत पक्षाच्या माध्यमातून उत्तर भारतीय नागरिकांच्या अधिकारांसाठी काम करत असतो.”

लॉरेन्स बिश्नोईला लिहिलेल्या या पत्रात पुढे सुनील शुक्ला यांनी असंही म्हटलं आहे की, “आम्ही तुमच्यात शहीद भगतसिंग यांना पाहतो. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तराखंडसह इतर पाच राज्यांतून आलेल्या लोकांना महाराष्ट्रात आरक्षणापासून वंचित ठेवलं जातं. मग जर भारत एक युनिट असेल तर आपण या अधिकारापासून वंचित का आहोत? असा सवाल सुनील शुक्ला यांनी केलाय. त्यावेळी त्यांनी लॉरेन्स बिश्नाईला जिंकून देण्याचं आश्वासन देखील दिलंय. आम्ही तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देत आहोत. उत्तर भारतीय विकास सेनेचे कार्यकर्ते आणि अधिकारी तुम्हाला उत्तम कामगिरीने निवडणूक जिंकून देऊ, असं सुनील शुक्ला यांनी म्हटलंय. आम्ही तयार आहोत, फक्त आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहतोय, असं देखील या पत्रात म्हटलं आहे.