मुंबई । नव्या सरकारच्या स्थापनेनंतर राज्यात मंत्रीपदांची वाटाघाटी आणि खात्यांच्या वाटपाबाबत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महत्त्वाच्या खात्यांसाठी मोठ्या स्पर्धेचे चित्र दिसत आहे.
महत्त्वाची खाती आणि त्यांचे राजकीय महत्त्व
गृह खाते : कायदा व सुव्यवस्था राखणे आणि राजकीय हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या खात्याकडे असते.
गृह खात्याचे मंत्री हे तपास अहवाल, गुप्तचर माहिती आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतात.
राजकीय दृष्टिकोनातून, हे खाते मोठ्या ताकदीचे मानले जाते.
गृहनिर्माण विभाग: मुंबई आणि इतर शहरांतील पुनर्विकास प्रकल्पांसाठी महत्त्वाचा विभाग. धारावी पुनर्विकास प्रकल्प, बीडीडी चाळ पुनर्विकास यांसारखे प्रकल्प यामध्ये येतात. या खात्यातून मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचे नियोजन आणि मंजुरी केली जाते, त्यामुळे राजकीयदृष्ट्या अत्यंत आकर्षक.
वित्त विभाग: सरकारच्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी वित्त खात्याच्या मंजुरीशिवाय होत नाही.
आर्थिक नियोजन, खर्च वाटप, आणि महसूल वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते.
नगरविकास विभाग: शहरी क्षेत्रांचा विकास, पायाभूत सुविधा, आणि शहर नियोजनाचे काम या विभागाकडे असते.
महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित योजनांचे नियोजन या खात्याच्या अखत्यारीत येते.
राजकीय स्पर्धा: मोठ्या प्रकल्पांशी निगडीत असलेल्या खात्यांसाठी ज्येष्ठ आमदार आणि महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. गृह, वित्त, आणि गृहनिर्माण खाती राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जातात.