जळगाव । नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने प्रभावी विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळणार आहे. नागपूर येथे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्यासाठी राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील महायुतीने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले असून, भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते मंत्रिमंडळात सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर गृह खाते व अन्य महत्त्वाच्या खात्यांवरून पेस निर्माण झाला होता. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयांनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त न करता पक्षाचे आदेश मान्य केले.
मंत्रिमंडळाचा विस्तार
जळगाव जिल्ह्यातील अपेक्षित मंत्री : गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील आणि संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात राज्यमंत्रीपदी राजू भोळे, किशोर पाटील यांच्या नावांचा विचार होऊ शकतो.
मंत्रीपदांचा फॉर्म्युला
महायुतीने २१ (भाजप), १२ (शिवसेना), आणि १० (राष्ट्रवादी) असा फॉर्म्युला ठरवला आहे.
भाजप गृह, अर्थ, जलसंपदा, ऊर्जा यांसारखी प्रमुख खाती ठेवणार आहे.
शिवसेनेला नगरविकास, शालेय शिक्षण, व उद्योग खाती मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला सार्वजनिक बांधकाम, कृषी, व महिला व बालकल्याण खाती मिळू शकतात.
शपथविधी सोहळा
उपराजधानी नागपूर येथे दुपारी ४ वाजता शपथविधी होईल.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती राहील.
राजकीय परिणाम
या मंत्रिमंडळ विस्तारामुळे महायुतीतील घटक पक्षांची सामंजस्यता दिसून येईल. जिल्हा आणि राज्य पातळीवर नेत्यांना जबाबदारी दिल्याने आगामी राजकीय समीकरणेही मजबूत होतील.