मुंबई : जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच जागतिक नेत्यांचाही भारताविषयीचा विश्वास वाढल्यामुळे भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा सिद्ध झाली असून, जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत, पापेक्षा अन्य पुराव्याची गरज नाही. जेथे राज्य, केंद्र सरकार एकत्र काम करतात, तेथे उद्योगांची सहाजिकच पहिली पसंती असते. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीस सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक उद्योगांची भावना असल्यामुळे विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी काढले.
मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत जयशंकर बोलत होते. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या तिसन्या पर्वात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीसाठी समर्पितपणे काम सुरू असून, त्यासाठी महाराष्ट्राचा विकास वेगवान असायलाच हवा. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात झालेले काम महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार सर्वसमान्यांपर्यंत पोहोचवत आहे. गेल्या काही महिन्यांत विदेशी गुंतवणूक, उत्पादन, निर्यातवाढ, याबाबत सरकारने मोठे निर्णय घेतले असून, त्यामुळे देशातील गुंतवणूक, पायाभूत सुविधांचा विकास तसेच रेल्वे, रस्ते वाहतुकीच्या सुविधा बळकट झाल्या आहेत. कौशल्य, शिक्षण, प्रशिक्षण यांच्या आधारे तरुण पिढीला रोजगारक्षम बनविण्यावर भर दिला जात असल्यामुळे आता केवळ देशातच नव्हे, तर अन्य देशांतही आमचे रोजगारक्षम तरुण नोकऱ्या मिळवू लागले आहेत.
आवश्यक असेल तिथे कुंपण घालणार
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे सीमेपलीकडून घुसखोरीचे काही प्रपत्न झाले. मोदी सरकार देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत राहील. जेथे आवश्यक आहे, तिथे कुंपण घातले जाईल, असे त्यांनी जयशंकर यांनी स्पष्ट केले. सीमासुरक्षेचा फेरआढावा घेतला जात असून, आम्ही सीमाभाग मोकळा राहू देणार नाही. कोणीही कसेही घुसावे ही २०१४ पूर्वीची स्थिती आता राहिलेली नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला.
सीमांच्या व्यवस्थापनावर चर्चा होणार
२१ ऑक्टोबरला चीन-भारत चर्चेत काही मुद्यांवर सहमती झाल्याने गस्त घालताना येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. मोठ्या संख्येने समोरासमोर असलेले सैन्य मागे घेण्यावर सहमती झाली असून, आता सीमांच्या व्यवस्थापनावर चर्चा होणार आहे. दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दहशतवादाचा चेहरा जगासमोर उघडा करून, कारवाईची गरज आहे, तेथे कठोर पावले टाकणारच, असे त्यांनी परखडपणे सांगितले.