Maharashtra Liquor Sale Update : सध्या देशभरात नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाचे वातावरण असून, त्यातच तळी रामासाठी एक खुशखबर आली आहे. २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या विशेष दिवशी मद्यविक्रीच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे.
गृह विभागाच्या आदेशानुसार, दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहतील, तर बार आणि पब यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी मिळाली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था, तसेच सार्वजनिक शांततेचे भंग होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी नाकारण्याचा अधिकार दिला आहे. यामुळे तळी रामांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यभरात मद्यविक्रीची वेळ वाढवल्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष साजरा केला जात आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार, दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहतील, तर बार आणि पब यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी मिळाली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था, तसेच सार्वजनिक शांततेचे भंग होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी नाकारण्याचा अधिकार दिला आहे. यामुळे तळी रामांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.