मुंबई: महारष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागले आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्ष्यांनी जोरदार कंबर कसली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यातच महारष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. पालघर काँग्रेसचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंगडा व नरेश कोरडा हे पदाधिकारी आपल्या समर्थकांसह 3 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यातील एक चर्चेतील नाव म्हणजे माजी खासदार दामू शिंगडा यांचे सुपुत्र सचिन शिंगडा यांचे आहे.
कोण आहेत दामू शिंगाडा ?
दामू शिंगडा हे काँग्रेसकडून त्यावेळच्या डहाणू लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार राहिले आहेत. दामू शिंगडा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जात. 2021 साली कोरोनाने त्यांचे निधन झाले. आता त्यांचे सुपुत्र सचिन शिंगडा हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. सचिन शिंगडा पालघर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी आहेत. विक्रमगडमध्ये विद्यमान आमदार सुनील भुसारा हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाटेल येणार जवळपास स्पष्ट झाले आहे.
राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार! आज जळगावसह २५ जिल्ह्यांना अलर्ट
त्यामुळेच सचिन शिंगडांनी मनसे प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. नुकतीच त्यांनी राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. सचिन शिंगडा यांनी 2014 मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाल होता.