Maharashtra-Politics-Assembly महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीस सत्ता मिळाली तर सरकारचे नेतृत्व काेणी करावयाचे यावरून निवडणुकीआधी सुरू झालेली महाविकास आघाडीतील धुसफूस आता वेगळ्या कारणामुळे अधिक धुमसू लागली आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा, असा आग्रह निवडणुकीआधी धरणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेस आता विराेधी पक्षनेतेद मिळविण्यासाठी आणि विधान परिषदेतील आहे ते विराेधी पक्षनेतेपद टिकविण्यासाठी आघाडीतील पक्षांची मनधरणी करण्याची वेळ यावी, हा त्यांच्या पक्षास पाहावा लागलेला राजकीय दैवदुर्विलास म्हणावा लागेल. Maharashtra-Politics-Assembly 2021 च्या जुलै महिन्यात ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एक भाकीत वर्तविले हाेते. राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर असलेल्या ठाकरे यांना काेणा एका सर्वेक्षणात देशातील सर्वाेत्तम मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती लाभल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर, ठाकरे यांनी देशाचे नेतृत्व करावे या अपेक्षांना त्या वेळच्या शिवसेनेत धुमारे फुटले हाेते. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे देशाचे भावी पंतप्रधान हाेऊ शकतात, असे ते भाकित राऊत यांनी ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून वर्तविले हाेते.
Maharashtra-Politics-Assembly त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव या यादीत केव्हापासूनच समाविष्ट झाले हाेते. पुढे पवार यांचे नाव या पदाच्या प्रतीक्षा यादीत दाखल झाले, तरीही या पदासाठीची त्यांची उमेदवारी कायमच हाेती. 2019 मध्ये रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन प्रवक्त्यांनी तर त्यांचे नाव जाहीरच करून टाकले हाेते. 2019 च्या निवडणुकीनंतर शरद पवार हे पंतप्रधान हाेतील, असा दावा त्या वेळचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी केल्यानंतर शरद पवार यांना जातीने त्यावर सारवासारव करावी लागली हाेती. या पदावर दावा करण्यासाठी बहुमताचे संख्याबळ साेबत असावे लागते आणि ते आमच्या पक्षाकडे नसल्याने पटेल यांनी सदिच्छा व्यक्त केल्या तरी वस्तुस्थिती तशी नाही, असे सांगून स्वतः पवार यांनी त्या दाव्याचा वाद मिटवून टाकला हाेता. ठाकरे यांनी मात्र तसे काहीच न केल्याने, ते स्वतःस या पदाचे लायक उमेदवार समजत असावेत, असा सर्वांचा समज झाला. त्यानंतरच्या महाराष्ट्रातील राजकीय घडामाेडी आता सर्वांस ठाऊक आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्रिपदाचा दावादेखील साेडून उद्धव ठाकरे पुन्हा पक्षप्रमुख पदावर रुजू झाले आणि पुढे पक्षच फुटल्याने एका गटाच्या प्रमुखपदावर समाधान मानण्याची वेळ त्यांच्यावर आली.
Maharashtra-Politics-Assembly ठाकरे यांच्या संदर्भातील राऊत यांचा पंतप्रधानपदाचा ताे दावा आजही कायम आहे किंवा नाही, हे स्पष्ट झालेले नाही. पण अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालांनी त्यांना त्या अपेक्षांपासून दूर नेऊन ठेवले आहे, यात मात्र शंका नाही. आता पुन्हा तसा दावा करण्यासाठी पवार यांच्यासाेबतच, उद्धव ठाकरे यांनाही आपल्या व्यापक नेतृत्व क्षमता नव्याने सिद्ध कराव्या लागतील. अन्यथा, शरद पवार यांच्या पाठाेपाठ पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतील महाराष्ट्रातील दुसरे नाव म्हणूनच उद्धव ठाकरे यांना प्रतीक्षा यादीत ताटकळत बसावे लागेल. सध्या या उभय नेत्यांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान काहीसे डळमळीतच झाले असल्याने आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान संख्याबळाअभावी नगण्य राहिल्याने, पंतप्रधानपदाच्या वादापाठाेपाठ विधानसभा निवडणुकीआधी सुरू केलेला मुख्यमंत्रिपदाचा वादही महाविकास आघाडीस गुंडाळून ठेवावा लागला. Maharashtra-Politics-Assembly आता किमान विराेधी पक्षनेतेपद तरी आपल्या पक्षाच्या पदरात पडावे यासाठी ठाकरे यांच्या गटाची कसरत सुरू झाली आहे. कारण विधानसभेतील विराेधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असणारे किमान संख्याबळही त्यांच्या गटाकडे नाही. कधी काळी स्वप्नवत असलेले पंतप्रधानपद वास्तवात दूरच राहिले, हाताशी आलेल्या मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली आणि आता तर, विराेधी पक्षनेतेपदासाठी विनवण्या करण्याची वेळ आली, ही सध्या महाविकास आघाडीतील या नेत्यांची राजकीय शाेकांतिका ठरली आहे.
Maharashtra-Politics-Assembly निवडणुकीत मतदारांनी दिलेला काैल स्वीकारण्याचा समंजसपणा दाखवावा लागताे, पण अलिकडच्या निवडणुकीत मतदारांनी या आघाडीस सत्तेपासून दूर ठेवलेच; पण विराेधी पक्षनेतेपदाचा दावा करण्याएवढे संख्याबळही त्यांच्याकडे दिले नाही, हा या शाेकांतिकेचा कळसाध्याय म्हणावा लागेल. विधिमंडळात प्रबळ विराेधी पक्ष असणे ही भक्कम लाेकशाहीची शक्ती असते. विराेधी पक्षांचे संख्याबळ कमी असले, तरी प्रसंगी सरकारला वैधानिक आयुधांचा वापर करून धारेवर धरणे, सरकारच्या कारभारावर अंकुश ठेवणे आणि राजकारणापलीकडे जाऊन राज्यातील जनतेच्या हिताचा विचार करणारे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडणे, ही जबाबदारीची कामे विराेधी पक्षास पार पाडावीच लागतात. त्यासाठी संख्याबळासाेबतच प्रगल्भ राजकीय समजदेखील गरजेची असते. Maharashtra-Politics-Assembly सध्या मात्र विराेधी पक्षनेतेपदावर हक्क प्रस्थापित करण्याकरिता आवश्यक असलेले संख्याबळ नसल्याने सत्ताधारी महायुतीने मनाचा माेठेपणा दाखविला तरच हे पद विराेधकांतील माेजक्या संख्याबळाच्या काेणा एका पक्षास मिळेल अशी स्थिती आहे. त्यामुळे विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के म्हणजे किमान 28 सदस्य असलेला पक्ष विराेधकांतील अन्य पक्षाहून माेठा असेल, तर त्या पक्षास विराेधी पक्षनेतेपद मिळू शकते, अशी तरतूद आहे.
Maharashtra-Politics-Assembly सद्यस्थितीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काेणत्याही एका पक्षाकडे 28 एवढी सदस्यसंख्या नसल्याने विराेधी पक्षनेतेपदासाठी पुन्हा आघाडीची माेट बांधून या पदासाठी सत्ताधारी पक्षाकडे मागणी करण्याची तयारी महाविकास आघाडीने केल्याने, सरकार पक्षाकडून त्यास मान्यता मिळाली तरच हे पद विधानसभेत दिसू शकते. तसे झाल्यास, महाविकास आघाडीतील घटक पक्षांत या पदावरून पुन्हा एकदा जाेरदार रस्सीखेच पाहावयास मिळेल, अशी चिन्हे आहेत. निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या मागणीवरून जी परिस्थिती महाविकास आघाडीत उद्भवली हाेती, तीच स्थिती आता विराेधी पक्षनेत्याच्या मागणीवरून आघाडीच्या अंतर्गत राजकारणात पाहावयास मिळू शकते असे चित्र असल्याने, अगाेदरच फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या महाविकास आघाडीतील धुसूस पुन्हा डाेके वर काढेल, अशी चिन्हे आहेत. Maharashtra-Politics-Assembly महाविकास आघाडी ही विराेधकांच्या राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीचाच घटक असल्याने व सध्या इंडिया आघाडीतच नेतृत्वाचा वाद उाळून आला असल्याने, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांना केंद्रीय स्तरावरील वादाकडे डाेळेझाक करून सामंजस्याने विराेधी पक्षनेतेपदाचा वाद साेडवावा लागेल. सध्या तशीही परिस्थिती दिसत नाही. इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधींकडून काढून घेतले नाही, तर आघाडीला भवितव्य नाही या जाणिवेने आघाडीत हताशा दाटली आहे.
काँग्रेस व काँग्रेसेतर पक्षांत आता आघाडीच्या नेतृत्वावरून सुरू झालेल्या वादाची मुळे महाराष्ट्रातच रुजल्याचे स्पष्ट हाेऊ लागले असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची माेट सांभाळणे साेपे नाही, याची जाणीव या आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटास आहे. Maharashtra-Politics-Assembly त्यामुळेच या पदावरचा दावा भविष्यात वादाचे मूळ ठरू शकताे, याचेही भान या नेत्यांना राखावे लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटास लागलेल्या या ओहाेटीतून पुन्हा सावरायचे असेल, तर त्यांना भविष्यात अनेक राजकीय तडजाेडी कराव्या लागतील, असा सद्यस्थितीचा अर्थ आहे. त्यातच विधान परिषदेतील ठाकरे गटाकडे असलेल्या विराेधी पक्षनेतेपदावर दावा करण्याच्या काँग्रेसच्या हालचालींनी अस्वस्थतेत भर टाकली आहे. विधानसभेतील या पदाचा वाद सामंजस्याने मिटण्याआधीच विधान परिषदेतील विराेधी पक्षनेतेपदाचा नवा वाद ठाकरे कशा रीतीने हाताळतात, त्यावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या भावी वाटचालीचा मार्ग स्पष्ट हाेणार आहे. Maharashtra-Politics-Assembly अन्यथा, केंद्रात डळमळीत झालेल्या इंडिया आघाडीप्रमाणे महाराष्ट्रातील या महाविकास आघाडीची अवस्था हाेईल आणि अशा आघाड्या म्हणजे गाजराची पुंगी ठरतात हे पुन्हा एकदा स्पष्ट हाेईल. भक्कम लाेकशाहीसाठी विराेधक सक्षम असणे ही लाेकशाहीची अपेक्षा पूर्ण करण्याकरिता तरी या पक्षांनी एकत्र राहावयास हवे.