Maharashtra weather : विदर्भ वगळता राज्यात गारठ्यासोबत अवकाळी पावसाचा IMD चा इशारा

by team

---Advertisement---

 

Maharashtra weather update: गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला असून किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे . येत्या दोन दिवसात राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असून तापमानात ३ ते ४ अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पण त्यानंतर तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होणार असून विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता असल्याचं IMD नं सांगितलंय .

सध्या भारताच्या वायव्य भागात नव्याने पश्चिमी चक्रावात तयार झाला आहे . तर उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढण्यास मदत होतेय .मागील दोन दिवसांपासून तापमानात चढउतार पाहायला मिळत असून अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्याने ४८ तासानंतर राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

#image_title

हवामान खात्याचा अंदाज काय?

कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २४ तासात तापमानात दोन ते चार अंशांची घट होणार असून किमान तापमान घसरणार आहे . विदर्भ वगळता उर्वरित राज्यात दोन दिवसानंतर तापमानात वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे .विदर्भात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा सांगण्यात आलंय . प्रादेशिक हवामान केंद्रानुसार १० व ११ जानेवारी रोजी हा पावसाचा अंदाज देण्यात आला असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय .

राज्यभरात किमान तापमानाचा पारा किती ?

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात किमान तापमानात चढ उतार दिसत आहे . राज्यात कोरडे वारे वाहत असून बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा उतरलाय .मंगळवारी पुण्यात १२ ते १५ अंश सेल्सिअसची नोंद झाली असून पहाटे गारठा वाढला होता . बहुतांश मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान घटले होते . १२ ते १६ अंशांपर्यंत किमान तापमानाची नोंद झाली आहे .

थंडीचा कडाका वाढणार

चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरावर आहे. अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने तापमानात बदल होत आहेत. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात बहुतांश भागात येत्या २-३ दिवसात तापमान घसरणार आहे. त्यानंतर हलक्या पावसाची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---