---Advertisement---

Maharashtra Weather Update : थंडी ओसरली, महाराष्ट्रात पुढील तीन दिवस असं राहणार तापमान

---Advertisement---

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानात चिंताजनक बदल दिसत आहे. यंदा उन्हाळा लवकरच सुरू झाला असून, तापमानाचा पारा आतापासूनच 35 अंश सेल्सियस ओलांडण्याची नोंद झाली आहे.

केवळ तापमानच नाही, तर दिवसा गारठा आणि दुपारी प्रखर उन्हाचा चटका देखील जाणवत आहे. काही भागात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याने ढगाळ वातावरण आहे.

तापमानातील तीव्र चढउतार

तापमानात होणाऱ्या वारंवार चढउतारामुळे आरोग्याच्या कुरबुरी वाढल्या आहेत. संसर्गजन्य आजारांच्या लागणीतही वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या 3 ते 4 दिवसांत किमान आणि कमाल तापमानात 2-3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : दारूच्या नशेत पत्नीची वेगळीच मागणी, नकार दिल्याने पतीला दिला बेदम चोप!

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, फेब्रुवारीपासून तापमानात वाढ होणार आहे. येत्या 3 दिवसांत किमान तापमानात 2-3 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूर्व राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात आहे. त्यामुळे राजस्थानसह उत्तर प्रदेशच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची चिन्हे आहेत.

उन्हाचा चटका अधिक जाणवणार

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात उकाडा जाणवण्यास सुरुवात होईल. येत्या 2 दिवसात तापमानात 2-3 अंशांची वाढ होईल, आणि नंतर हळूहळू ते कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भात सध्या फारसा बदल दिसत नाही, परंतु त्यानंतर 2-3 अंशांची घसरण होईल.

हेही वाचा : धक्कादायक! महिलेने पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या अन्… नेमकं काय झालं?

शहरांमधील तापमान

मुंबई: कुलाब्यात 20.8 अंश, सांताक्रूझमध्ये 18.6 अंश तापमानाची नोंद झाली.
नाशिक: 12-16 अंश तापमान नोंदवले गेले.
पुणे: 14-16 अंश तापमान.
सोलापूर: 18-20 अंश तापमान.
नगर: 15 अंश किमान तापमान.
जळगाव : 34
लातूर: 21.1 अंश
बीड: 17 अंश
छत्रपती संभाजीनगर: 17.5 अंश
हिंगोली: 16.9 अंश
नांदेड: 18.7 अंश तापमान नोंदवले गेले.

हवामानातील या बदलामुळे नागरिकांना पुढील काही दिवसांमध्ये अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment