---Advertisement---

Maharashtra Weather Update : नागरिकांनो, सावधान! बाहेर पडताना छत्री विसरू नका, कारण…

---Advertisement---

Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात झपाट्यानं वाढ होत असून, उन्हाचा तडाखा तीव्र झाल्याचं दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडताना दिसत आहे. थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यामध्येही दिवसा तापमान 37.6 अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे हवामानातील बदलांचा परिणाम नेमका कोणत्या दिशेने जात आहे, याची चिंता व्यक्त केली जात आहे.

हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी X (ट्विटर) वर दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान 37 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असली, तरी प्रत्यक्ष उन्हाळा सुरू झाल्यावर परिस्थिती कशी असेल, याबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे.

हेही वाचा : पृथ्वीच्या गतीचा थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल! आभाळ स्थिर, तर पर्वत-घरं फिरताना दिसली

सध्या राजस्थानच्या नैऋत्य भागासह नजीकच्या परिसरात चक्राकार वारे वाहत असून, उत्तर भारतामध्ये पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव अधिक जाणवत आहे. महाराष्ट्रावरही या परिस्थितीचा प्रभाव दिसत आहे. त्यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे.

कोकण किनारपट्टी भागामध्ये दमट वातावरण वाढले असून, उष्णता अधिक जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सकाळच्या थोड्या गारव्याखेरीज दुपारच्या वेळी तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावत होता. मात्र, वाढत्या उन्हामुळे आणि वाऱ्यांच्या स्थितीमध्ये होत असलेल्या बदलांमुळे हवेचा दर्जा हळूहळू सुधारताना दिसत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबईतील काही भागांमध्ये हवेचा दर्जा समाधानकारक श्रेणीत पोहोचल्याचं नोंदवण्यात आलं आहे.

मध्य भारत आणि महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढत असताना, उत्तर भारतात अजूनही थंडी कायम आहे. मात्र, दुपारच्या वेळी तापमानात काहीशी वाढ होत आहे आणि लख्ख सूर्यप्रकाश पाहायला मिळत आहे. पूर्वोत्तर भारतात पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, 12 फेब्रुवारीपर्यंत काश्मीरच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये तापमानात मोठ्या फरकाने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील तापमान सातत्याने वाढत असून, उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीच तीव्र उष्णतेचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हवामानातील बदलांवर अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment