---Advertisement---

तीन महिन्यांत होणार महाराष्ट्र भोंगेमुक्त ! किरीट सोमय्या यांचा दावा

---Advertisement---

मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांचा आवाज राज्यात यापुढे पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. एक महिन्यामध्ये मुंबई आणि तीन महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार असल्याचा दावा भाजपाचे किरीट सोमय्या यांनी आज, २३ मे रोजी वाशीम येथे पत्रकार परिषदेत पत्रकाराशी केला.

सोमय्या म्हणाले की, राज्यामधील सर्व मशिदीवरचे भोंगे बेकायदेशीर असून उच्च न्यायालयाने याबाबत आपला निर्णयही दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. याबाबत कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील मशिदींवर लागलेल्या एकाही भोंग्यास परवानगी नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र तीन महिन्यात भोंगेमुक्त होणार असल्याचेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. ते म्हणाले, याबाबत मी स्वतः ५० पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली असून वाशीम येथे जिल्हा पोलिस अधीक्षकांशी सविस्तर चर्चा केली आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर घुसखोरांनी जन्माच्या दाखल्पासाठी अर्ज केले. २ लाख २४ हजार लोकांपैकी १ लाख २३ हजार लोकांना जन्माचे दाखले दिले गेले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी याबाबत एसआयटीची स्थापना केली. एसआयटीच्या चौकशीमध्ये दीड लाख लोकांपेक्षाही अधिक अर्ज बोगस असून हे सर्व अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरित ७५ हजार बोगस अर्जदार पळून गेले असल्याचे यावेळी किरीट सोमय्या म्हणाले.

वाशीम येथेही याबाबत फार मोठा घोटाळा असून ३.५०० लोकांना बोगस जन्म दाखले दिले गेले आहेत. हे सर्व दाखले परत घेण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. बोगस जन्म दाखल्याच्या प्रकरणामध्ये मंगरुळनाथ येथील तहसीलदाराचे कार्य अतिशय अपारदर्शक असून याबाचत आपण महसूल सचिवाकडे तक्रार दाखल केल्याचे सोमय्या म्हणाले.

२०२४ मध्ये दाखल्यासाठी २ लाख २४ हजार अर्ज आले. त्यानंतर २०२५ मध्ये दाखल्यासाठी १ हजारही अर्ज शासनाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे त्यावेळी बोगस अर्जाची व्याप्ती किती मोठ्या प्रमाणात होती हे लक्षात येईल, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी आ. श्याम खोडे, आ. सई डहाके, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, मनीष मंत्री, नवीम शर्मा, राहुल तुपसांडे आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment